पणजी - संमोहनाला विज्ञानाच्या परिभाषेत मांडणाऱ्या एब्बे फारिया यांची आज 200 वी पुण्यतिथी. फारिया यांनी पोर्तुगीज राजवटीविरोधातील पहिले बंड. फ्रेंच राजक्रांतीमध्येही त्यांचा सहभाग होता. परंतु, या महान गोमंतकीय सुपुत्राचा उपेक्षित म्हणून मृत्यु झाला. गोवा मुक्तीनंतर आजही ते उपेक्षित असल्याचेच दिसते.
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि 'गोष्ट एब्बे फारियाची' पुस्तकाचे लेखक डॉ. रुपेश पाटकर अलेक्झांडर ड्युमा या फ्रेंच कादंबरीकारच्या 'द काऊंट ऑफ मॉन्टो क्रिस्तो' या दोनशे वर्षांपूर्वीच्या कादंबरीमध्ये एब्बे फारिया नावाचे पात्र असल्याचे अनेकांना माहिती आहे. परंतु, या नावाचा इसम दोनशे वर्षांपूर्वी गोव्याच्या भूमित जन्माला होता. याविषयी मात्र अनेकजण अनभिज्ञ आहेत. त्यांनी पोर्तुगाल आणि रोममध्ये शिक्षण घेतले होते. संमोहनावरील आपले साहित्य फारिया यांनी फ्रेंच भाषेत प्रसिद्ध केले होते. फारिया वैद्यक शास्त्राचे शिक्षण घेतलेल्यांना संमोहन शास्त्रातील तज्ञ म्हणून माहिती आहे. परंतु, काही अपवादात्मक लोकांना माहीत आहे की, ते कोकणी भाषा बोलणारे गोमंतकीय होते.
हेही वाचा -दहशतवादाविरोधात सर्व राष्ट्रांनी एकवटायला हवं - सय्यद अकबरुद्दीन
उत्तर गोव्यातील बार्देशमधील कांदोळी हे फारियाचे जन्म गाव. गोव्याची राजधानी पणजीमध्ये जुन्या सचिवालयाच्या बाजूला एक पुतळा आहे. ज्यामध्ये एक महिला खाली पडलेली असून उभ्या असलेल्या माणसाकडे पाहत आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही हे ठिकाणी दिसले आहे. यात उभी असलेली व्यक्ती फारिया आहेत. शहरातील हा पुतळा 20 सप्टेंबर 1945 ला पोर्तुगीज राजवट असतानाही शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी उभारला आहे. पुतळ्यातील व्यक्ती विदेशी असल्यासारखे वाटते. त्यामुळे बहुदा त्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. ज्या महापालिका क्षेत्रात हा पुतळा येतो त्यांचेही याकडे फारसेम लक्ष नाही. त्यामुळे जी उपेक्षित वागणूक अंतिम समयी फारियांच्या वाट्याला आली होती, ती आजही कायम असल्याचे चित्र आहे.
फारिया यांनी 21 फेब्रुवारी 1771 ला गोव सोडले आणि, 23 नोव्हेंबर 1771 ला ते लिस्ब, पोर्तुगालमध्ये शिक्षणासाठी गेले. त्यानंतर रोममध्ये त्यांनी धर्म शास्त्राचे शिक्षण घेतले. लिस्बनला असताना वडिलांसह त्यांनी पोर्तुगीज राजवटीविरोधातील पहिल्या 'पिंटो उठालात' सहभाग घेतला होता. नंतर, अटक होण्याच्या भीतीने ते फ्रान्सला गेले. तेथील फ्रेंच राजक्रांतीमध्ये (1784) मध्येही ते सहभागी झाले.
हेही वाचा -लैंगिक अत्याचार प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री व भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना १४ दिवसांची कोठडी
एब्बे फारिया विषयी बोलताना प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आणि 'गोष्ट एब्बे फारियाची' पुस्तकाचे लेखक डॉ. रुपेश पाटकर म्हणतात, फ्रान्समध्ये फारियाची ओळख मार्कुस फोन्सेगाय या संमोहन तज्ञाशी झाली. त्यांनी तिथे संमोहनाचे प्राथमिक धडे घेतले. ते कसे घडते याचा शोध घेताला. त्यांनी मेसुरचा 'अँनिमल मँग्नेटिझमचा' सिद्धांत फेटाळून लावला. शब्दांची ताकद भावना बदलण्यासाठी किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. डॉ. इगॉस मोनिस या नोबेल पारितोषिक विजेत्या न्यूरोलॉजिस्टने एब्बे फारियांच्या जीवनावर पुस्तक लिहिले आहे. एब्बे फारियांचा मृत्यु 20 सप्टेंबर 1819 रोजी झाला होता.