नवी दिल्ली- आम्ही 'आप' पक्षात १ कोटी लोकांना जोडणार असून त्यासाठी आम्ही २३ फेब्रुवारी ते २३ मार्च पर्यंत देशातील प्रत्येक राज्यात मोहीम चालविणार असल्याचे पक्षाचे नेते आणि मंत्री गोपाल राय यांनी सांगितले आहे.
आम आदमी पक्षाने २०२० दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवले आहे. पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकल्या आहेत. निवडणुकीत जोरदार यश मिळवल्यानंतर १ कोटी जनतेला पक्षामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपकडून राष्ट्रीय पातळीवर मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे राष्ट्रीय पातळीवर पक्षाचा प्रसार प्रचार करण्यात येणार आहे.