नवी दिल्ली - आम आदमी पक्षाचे आमदार सोमदत्ता यांना राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सहा महिण्याची शिक्षा ठोठवण्यात आली आहे. 2015 मध्ये एका व्यक्तीला बेसबॉलने मारहाण केल्याप्रकरणी त्यांना ही शिक्षा ठोठवण्यात आली. याचबरोबर त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
आम आदमी पक्षाच्या 'या' आमदाराला सहा महिण्यांची शिक्षा
आम आदमी पक्षाचे आमदार सोमदत्ता यांना सहा महिण्यांची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.
जानेवारी 2015 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सोमदत्ता यांनी एका व्यक्तीला बेसबॉल बॅटने मारहाण केली होती. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान सोमदत्त आपल्या 50 समर्थकांसह संजीव राणा यांच्या घरी गेले होते. यावेळी ते दारावरची डोअरबेल सारखी वाजवत होते. यावर आक्षेप घेतल्यानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी राणा यांना घरातून ओढत रस्त्यावर आणले आणि बेसबॉल बॅटने मारहाण केली. या मारहाणीमुळे संजीव राणा जखमी झाले होते. त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले होते.
याप्रकरणी सोमदत्त यांना पीडित संजीव राणा यांना 1 लाख रुपये देण्याचेही सांगण्यात आले आहे. तर राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोमदत्त यांना जमानत दिली आहे. गेल्या 29 जूनला आमदार सोमदत्त यांना न्यायालयाने दोषी ठरवले होते.