नवी दिल्ली- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रेड्डींनी २ लाख ५८ हजार कोटींचे कर्ज असलेल्या आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांना राजी करावे, अशी मागणी अमित शाहांकडे केली.
जगनमोहन रेड्डी आणि अमित शाहांची भेट; आंध्रला विशेष दर्जा देण्याबाबत चर्चा - वायएसआर काँग्रेस
रेड्डींनी २ लाख ५८ हजार कोटींचे कर्ज असलेल्या आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यासाठी पंतप्रधानांना राजी करावे, अशी मागणी अमित शाहांकडे केली.
जगनमोहन रेड्डी बैठकीबाबत बोलताना म्हणाले, पहिली गोष्ट अशी, की आम्हाला कोणत्याही पदाची ऑफर देण्यात आली नाही. आम्हीही त्यांना याबाबत अजून विचारणा केलेली नाही. किंवा त्यांनीही आम्हाला कोणती ऑफर दिली नाही. त्यामुळे, तुम्ही कोणत्याही पदाबाबत अनुमान लावू नये. बैठकीत मी आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्याबाबत गृहमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. शनिवारी होणाऱया निती आयोगाच्या संचालन परिषदेच्या पहिल्या बैठकीत मी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी लावून धरणार आहे.
वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी केंद्राकडे आंध्रप्रदेश पुनर्गठन अधिनियम अंतर्गत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आग्रह केला आहे.