थ्रिसुर - जिल्ह्यातील वडकुंनाथ मंदिरात रविवारी आनयुट्टू उत्सव साजरा करण्यात आला. हा उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत असतो. या उत्सवाचे महत्व म्हणजे यात उपस्थित हत्तींना पोषक असे खाद्यपदार्थ खाऊ घातले जातात
आनयुट्टू, हत्तींसाठी एक धार्मिक अनुष्ठान उत्सव आहे. हा उत्सव भगवान शिव यांना समर्पित असलेल्या प्रसिद्ध वडकुंनाथ मंदिराच्या परिसरात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उत्सव रविवारी वडकुंनाथ मंदिरातील आवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये एका रांगेत उभे असलेल्या जवळपास ७० हत्तींना भाविकांनी मोठ्या संख्येने खाद्य पदार्थ भरविले. हा उत्सव हिंदु सणातील एक महत्वाचा उत्सव असून तो गणपतीची स्थापना करण्यासाठी या उत्सवाचे आयोजन केले जाते.