नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाने 'राष्ट्र निर्माणासाठी आम आदमी पक्षात सहभागी व्हा' हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात २४ तसांमध्ये ११ लाख लोकांनी सहभाग घेतल्याचा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
'आप'च्या राष्ट्र निर्माण अभियानात २४ तासात ११ लाख लोकांचा सहभाग - आम आदमी पार्टी
दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा यश मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्याकडे राष्ट्रीय नेता म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. आम आदमी पक्षाने 'राष्ट्र निर्माणासाठी आम आदमी पक्षात सहभागी व्हा' हे अभियान सुरू केले आहे

आप'ने एक मोबाईल नंबर जाहीर केला होता. त्यावर मिस कॉल दिल्याने अभियानात सहभाग नोंदवता येत आहे. विविध माध्यमांद्वारे या अभियानाला प्रसिद्धी देण्यात आली होती. दिल्ली विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा यश मिळवल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्याकडे राष्ट्रीय नेता म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपपुढे पर्याय उभा करण्याच्या दृष्टीने हे अभियान असल्याचे बोलले जात आहे. त्याद्वारे भारतभर पक्षाचा विस्तार वाढवण्यास सुरुवात झाली आहे.
दिल्ली विभानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ७० पैकी ६२ जागा मिळाल्या. भाजपने सर्व शक्ती पणाला लाऊनही दिल्ली काबीज करता आली नाही. स्थानिक विकासांच्या मुद्द्यांवर भर देत केजरीवाल यांनी निवडणुकीत बाजी मारली. तर राष्ट्रीय मुद्दे, शाहीन बाग, भारत पाकिस्तान, सीएए-एनआरसी या विषयांना दिल्लीकरांनी सपशेल नाकारले.