महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वाहतूक पोलिसांनी दंड केल्याच्या रागातून युवकानं पेटवली स्वत:ची नवीकोरी दुचाकी - दुचाकी पेटवली

दिल्लीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग धरून एका युवकाने स्वत:ची नवी कोरी गाडी पेटवून देण्याची घटना घडली.

fire
युवकानं पेटवली स्वत:ची नवीकोरी दुचाकी

By

Published : Jan 2, 2020, 11:47 AM IST

नवी दिल्ली- वाहतूक पोलिसांशी दंड आकारण्यावरून वाहन चालक आणि पोलिसांमध्ये वादावादी होण्याच्या घटना तुम्हाला माहीत असतील. मात्र, दिल्लीत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईचा राग धरून एका युवकाने स्वत:ची नवी कोरी गाडी पेटवून देण्याची घटना घडली.

पोलिसांनी तत्काळ आग विझवली मात्र, तोपर्यंत गाडीचे मोठ नुकसान झाले होते. हेल्मेट न घातल्यामुळे पोलिसांनी या युवकाला दंड केला होता. मात्र, कारवाईचा राग मनात धरून युवकाने हे कृत्य केले. ही घटना दिल्लीतील सीआर पार्क भागातील सावित्री चित्रपटगृहाजवळ घडली.

गाडीची तपासणी करताना युवकाकडे कागदपत्रेही आढळून आली नाहीत. त्यामुळेही पोलिसांनी दंड केला होता. गाडी नवी असल्याने गाडाची कागदपत्रे नसल्याचे युवकाचा भाऊ अमृत कुमार याने ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details