महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-पाक सीमेवर उस्मानाबादचा तरुण ताब्यात; प्रेयसीला भेटायला निघाला होता पाकिस्तानात

उस्मानाबाद येथील झिशान सिध्दिकी हा 20 वर्षीय तरुण पाकिस्तानातील एका मुलीच्या प्रेमात पडला. दरम्यान, त्या मुलीचे इतर कोणाशी लग्न जमले. त्यामुळे प्रेयसीला भेटण्यासाठी तो पाकिस्तानी सीमेवर गेला होता. मात्र, त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर पोलिसांनी पकडले.

a-young-man-from-maharashtra-crossed-the-border-from-the-desert-of-kutch-to-find-a-pakistani-girlfriend
भारत-पाक सीमेवर उस्मानाबादचा तरुण ताब्यात.

By

Published : Jul 17, 2020, 1:30 PM IST

Updated : Jul 18, 2020, 5:52 AM IST

गुजरात- चित्रपटाला साजेशी अशी कहाणी उस्मानाबाद येथील एका तरुणाची घडली आहे. आपल्या पाकिस्तानी प्रेयसीला भेटण्यासाठी हा तरुण चक्क पाकिस्तानला निघाला होता. मात्र, पाकिस्तानच्या सीमेवर सीमा सुरक्षा दलाने त्या तरुणाला पकडले आहे. झिशान सिध्दिकी असे या तरुणाचे नाव आहे.

भारत-पाक सीमेवर उस्मानाबादचा तरुण ताब्यात

उस्मानाबाद येथील झिशान सिध्दिकी हा 20 वर्षीय तरुण पाकिस्तानातील एका मुलीच्या प्रेमात पडला. दरम्यान, त्या मुलीचे इतर कोणाशी लग्न जमले. त्यामुळे प्रेयसीला भेटण्यासाठी तो पाकिस्तानी सीमेवर गेला होता. मात्र, त्याला रात्री पाकिस्तानी सीमेवर पोलिसांनी पकडले.

बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबादमधील झिशान सिध्दिकी सोशल मीडियाच्या माध्यमातून एका पाकिस्तानी मुलीच्या संपर्कात आला. आणि नंतर दोघेही प्रेमात पडले. प्रेयसीला भेटण्यासाठी तो गुगलच्या नकाशाच्या आधारे कच्छ येथे दुचाकीवर पोहोचला. त्याठिकाणी त्याची दुचाकी वाळूत फसल्याने तो तेथून पायी चालत निघाला होता.

दरम्यान, 11 जुलै रोजीपासून झिशान सिध्दिकीचा तपास सुरू होता. तो कोणालाही न सांगता पाकिस्तानकडे निघाला होता. त्याच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासणीत झिशान सिध्दिकी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी मुलीवर प्रेम करत असल्याचे समोर आले आहे. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलिसांनी कच्छ पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, कच्छच्या वाळवंट भागात गस्त घालत असलेल्या बीएसएफच्या पथकाला एक दुचाकी अडकलेली आढळली. आणि एका व्यक्तीचे पावले पाकिस्तानकडे जात असल्याचे स्पष्ट झाले. त्याआधारे शोधमोहीम आखली असता पाकिस्तानी सीमेवर सीमा सुरक्षा दलाने झिशान सिध्दिकीला ताब्यात घेतले.


Last Updated : Jul 18, 2020, 5:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details