कांगड़ा - हिमाचल प्रदेशमध्ये तरुणांना नशेच्या सवयीने एवढं जखडले आहे की आपली तलफ भागवण्यासाठी ते काहीही करण्यासाठी तयार असतात. याचं उदाहरण म्हणजे इंदौरा येथील छन्नी वेली येथे पाहण्यात आले आहे. देशात कर्फ्यू सुरू असताना एका तरुणाने बनावट डॉक्टर बनून गावात प्रवेश केला. मात्र नंतर त्याचा हा बनाव गावकऱ्यां च्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नशेसाठी काहीपण: ड्रग्ससाठी तरुणाने घेतले डॉक्टरचे सोंग - चिट्टा मामला इंदौरा
देशात कर्फ्यू सुरू असताना एका तरुणाने नकली डॉक्टर बनून गावात प्रवेश केला. मात्र नंतर त्याचा हा बनाव गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
नशेसाठी काहीपण: ड्रग्ससाठी नकली डॉक्टर बनून रचला बनाव
गावकऱ्यांनी या तरुणाचा व्हिडिओ देखील बनवला आहे. त्याच्याबाबत स्थानिकांनी सांगितलं की, हा तरुण दररोज डॉक्टर बनून गावात येत असे. मात्र त्याच्यावर आम्हाला शंका आल्याने त्याची कसून चौकशी केली असता तो हेरोइन (चिट्टा) घेण्यासाठी गावात येत होता, अशी कबूली त्याने दिली. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.