भुवनेश्वर - प्लास्टिक मुक्तीसाठी देशभर प्रयत्न सुरु आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओडिसातील भुवनेश्वरमधील एक दाम्पत्याने टाकाऊ असणाऱ्या प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत. त्यांनी प्लास्टिकपासून विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत.
१९९० पासून ओडिशातील दाम्पत्य बनवतंय प्लास्टिकपासून शोभेच्या वस्तू - १९९० पासून ओडीशातील दाम्पत्य बनवतंय प्लास्टिकपासून शोभेच्या वस्तू
प्लास्टिक मुक्तीसाठी देशभर प्रयत्न सुरु आहेत. अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ओडिसातील भुवनेश्वरमधील एक दाम्पत्यांने टाकाऊ असणाऱ्या प्लास्टिकपासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आहेत. त्यांनी प्लास्टिकपासून विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या आहेत.
भुवनेश्वरमधील सैलाबाला आणि त्यांचे पती गेल्या अनेक वर्षापासून प्लास्टिकच्या वस्तूपासून शोभेच्या वस्तू तयार करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये ते १९९० पासून या वस्तू तयार करत आहेत. सैलाबाला यांनी तयार केलेल्या वस्तू अनेकांना त्यांनी भेट दिल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्लास्टिकपासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू कशा तयार करायच्या याबाबतचे प्रशिक्षणही सैलाबाला देत आहेत. प्लास्टिक मुक्तीसाठी त्यापासून विविध सजावटीच्या आकर्षक वस्तू तयार करने गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. घरात जमा झालेल्या कचरा बाहेर टाऊन देण्यापेक्षा त्याचा वापर कसा करता येईल, याचा मी विचार केल्याचे सैलाबाला यांनी सांगितले. सैलाबाला यांनी कचऱ्यापासून फुल, झाडे, मोर अशा विविध वस्तू बनवल्या आहेत.