नवी दिल्ली- देशभरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. देशातील बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलीस दिवस - रात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. लॉकडाऊनदरम्यान घरातच राहण्याचे आवाहन पोलीस नागरिकांना करत आहेत. मात्र, तरीही शनिवारी एक महिला मास्क न बांधताच घरातून बाहेर पडली. जेव्हा पोलिसांनी तिला अडवून विचारपूस करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिने पोलिसांसोबतच वाद घालण्यास सुरुवात केली.
परदेशी महिलेचा पोलिसांसोबत वाद, मास्क न बांधल्याने अडवले असता घडला प्रकार - परदेशी महिलेचा पोलिसांसोबत वाद
लॉकडाऊनदरम्यान घरातच राहण्याचे आवाहन पोलीस नागरिकांना करत आहेत. मात्र, तरीही शनिवारी एक महिला मास्क न बांधताच घरातून बाहेर पडली. जेव्हा पोलिसांनी तिला अडवून विचारपूस करण्यास सुरुवात केली, तेव्हा तिने पोलिसांसोबतच वाद घालण्यास सुरुवात केली.
![परदेशी महिलेचा पोलिसांसोबत वाद, मास्क न बांधल्याने अडवले असता घडला प्रकार परदेशी महिलेचा पोलिसांसोबत वाद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6760734-9-6760734-1586675981779.jpg)
परदेशी महिलेचा पोलिसांसोबत वाद
व्हिडिओ आला समोर -
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर समजले, की ही महिला दक्षिण अमेरिकेतील उरुग्वे देशातील आहे. जी वसंत विहारमधील पश्चिम मार्गावरुन जात होती. यावेळी तिने मास्क किंवा हँड ग्लव्सचा वापर केला नव्हता. याच कारणामुळे पोलिसांनी तिला थांबवले होते.
परदेशी महिलेचा पोलिसांसोबत वाद