एटा- मुलं चोरण्याच्या संशयातून मारहाणीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. उत्तर प्रदेशच्या एटा शहरात अशीच एक घटना समोर आली आहे. मुल चोरण्याच्या संशयातून जमावाने महिलेला बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतरही जमावाने महिलेला पोलिसांसमोर मारहाण केली आहे.
मुलं चोरण्याच्या संशयातून उत्तर प्रदेशमध्ये महिलेला बेदम मारहाण - मुले चोर प्रकरणी महिलेला मारहाण
उत्तर प्रदेशच्या एटा शहरात मुलं चोरण्याच्या संशयातून महिलेला मारहाण करण्यात आली आहे. एसपी सुनील कुमार सिंह यांनी महिलेल्या मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.
शहरात मुलं चोरण्याच्या संशयातून एका महिलेला पकडण्यात आले. महिलेचे नाव बिना देवी असे असून ती हिमाचल प्रदेशची आहे. जमावाने पोलिसांना न कळवता थेट महिलेला मारहाण सुरु केली. या मारहाणीत स्थानिक महिलांनीही सक्रिय सहभाग घेतला होता. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी महिलेला वाचवण्याचे सोडून जमावाला समजवण्याचा प्रयत्न केला. जमावाने पोलिसांकडे दुर्लक्ष करत महिलेला मारहाण करणे सुरुच ठेवले. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणले.
महिलेला मारहाण प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसपी सुनील कुमार सिंह यांनी महिलेल्या मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.