नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे तेथे थंडीचा जोर वाढला आहे. सर्वत्र बर्फाची चादर पसरली असून बर्फवृष्टीमुळे या ठिकाणाचे सौंदर्य अनेक पटींनी वाढले आहे.
उत्तर भारतामध्ये जोरदार बर्फवृष्टी, काही मनमोहक दृश्य... - बर्फवृष्टीची मनमोहक दृश्य.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि लडाखमध्ये जोरदार बर्फवृष्टी होत आहे.
पांढरे शुभ्र हिम नग आणि बाजूला बर्फ पसरला आहे. डोंगरावर पांढर्या शुभ्र बर्फाची चादर टाकल्यासारखे वाटत आहे. झाडांवर, घरांवर सर्वत्र बर्फाची जणू मखमली पसरल्याचे चित्र दिसत आहे. डोळ्याचे पारणे फेडणारी नयनरम्य दृश्ये या ठिकाणी आहेत.
बर्फवृष्टीचे दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. वातावरणात दाट धुकेही पसरले आहे. बर्फवृष्टीमुळे शहरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अनेक महामार्ग बंद करण्यात आले आहेत. नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.