पाटणा - बिहारमधील जहानाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. रुग्णवाहिका न मिळाल्याने दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचा आरोप मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हृदयद्रावक..! रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने दोन वर्षीय मुलाचा मृत्यू - पाटणा
रुग्णवाहिका न मिळाल्याने दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याचा आरोप मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सदर प्रखंड येथील रहिवासी असेलेल्या महादलित कुटुंबातील 2 वर्षीय मुलाची शनिवारी अचानक मुलाची तब्येत बिघडली, त्यानंतर त्याला तातडीने जहानाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना पीएमसीएच येथे हलवण्याच्या सुचना दिल्या. मात्र, रुग्णालयाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली नाही. शेवटी थकून गेलेल्या कुटुंबीय मोटारसायकलवर मुलाला पाटणाला घेऊन जात होते. मात्र, मुलाचा रस्त्यामध्ये मृत्यू झाला.
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जहानाबादमध्ये रुग्णवाहिका नसल्यामुळे तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. त्यावर जहानाबाद डीएमने आरोग्य व्यवस्थापक, दोन डॉक्टर आणि चार परिचारिकांवरही कारवाईही केली होती.