नवी दिल्ली -मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर वाहन चालकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. ओडिशामध्ये एका ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम पाहून तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत. नागालॅंड येथे एका ट्रक मालकाला तब्बल ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
ट्रक चालकाला ठोठावला तब्बल ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड - truck owner in Sambalpur
नागालॅंड येथे एका ट्रक मालकाला तब्बल ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
![ट्रक चालकाला ठोठावला तब्बल ६ लाख ५३ हजार १०० रुपयांचा दंड](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4440982-596-4440982-1568468081423.jpg)
हेही वाचा -जस्ट चिल यार! गुजरातच्या रस्त्यांवरून मनसोक्त फिरणाऱ्या सिंहांचा व्हिडिओ व्हायरल
संबधित ट्रक मालकाचे नाव शैलेश शंकर लाला गुप्ता आहे. नागालॅंडमध्ये वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली आहे. शैलेश यांनी जुलै २०१४ पासून ते सप्टेंम्बर २०१९ पर्यंत कर भरला नव्हता. तर ट्रकचे प्रदूषण प्रमाणपत्र आणि विमा काढलेले नसल्याची माहिती आहे.
यापूर्वी दिल्लीमधील मुबारक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी एका ट्रक चालाकाला २ लाख पाचशे रुपयांचा दंड ठोठावला होता. याचबरोबर राजस्थानमधील एका ट्रकचालकाला देखील एक लाख ४१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे
हेही वाचा -दिल्लीतील बाबर रस्त्याच्या फलकाला हिंदू सेनेने फासले काळे
देशातील काही राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.