दिल्ली - मोटार वाहन कायद्यात दुरूस्ती केल्यानंतर वाहन चालकांना अव्वाच्या सव्वा दंड भरावा लागत आहे. नव्या नियमानुसार जास्तीत जास्त २५ ते ३० हजार रुपये दंड केला जाईल, असा तुमचा अंदाज असेल तर तो चुकीचा आहे. दिल्लील एका ट्रक चालकाला वाहतूक पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम पाहून तुमचे डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत. एका ट्रक चालकाला २ लाख पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा -गाव हागणदारी मुक्त केल्यानं पंतप्रधान मोदींनी संरपंचाच केलं कौतूक
संबधित ट्रक चालकाचे नाव राम किशन आहे. दिल्लीमधील मुबारक चौकांमध्ये वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंडाची कारवाई केली आहे. यापूर्वी राजस्थानमधील एका ट्रकचालकाला देखील एक लाख ४१ हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
हेही वाचा -पंतप्रधानांच्या हस्ते रांचीत 'किसान मानधन योजने'चा शुभारंभ
देशातील काही राज्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. वाढते रस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.