नवी दिल्ली - पावसाळ्याचे २ महिने संपत आले असले तरी अनेक राज्यात अजूनही दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायला हवा. मात्र, अनेकवेळा आपल्याकडून पाण्याचा अपव्यय होताना दिसून येतो. याच पार्श्वभूमीवर माजी निवडणूक आयुक्तांनी एका माकडाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर या माकडाला कळतंय मात्र आपल्याला कधी कळणार असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहणार नाही.
Video : वन्यप्राण्यांना कळतंय मात्र आपल्याला कधी कळणार ? - डॉक्टर एस.वाई कुरैशी
सध्या एका माकडाचा पाणी पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
माणसांना लाजवेल अशी माकडाची कृती, पाहा व्हडिओ
हा व्हिडिओ देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉक्टर एस.वाई कुरैशी यांनी आपल्या टि्वटरवर शेअर केला आहे. हा माणसांसाठी किती छान संदेश आहे असे कुरैशी यांनी म्हटले आहे. हा व्हिडीओ फक्त 11 सेंकदाच्या ह्या व्हिडीओला 1 लाख 61 हजार पाहण्यात आले आहे. तर 17 हजारपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. तर 5 हजार 500 जणांनी या व्हिडीओला रिटि्वट केले आहे.