महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राजस्थान : तांत्रिकाने बालिकेसह स्वतःला जाळले, अंधश्रद्धेतून प्रकार घडल्याची चर्चा

किस्तूराम याने एका आठ वर्षांच्या मुलीसह स्वतःला जमिनीत केलेल्या एका खड्ड्यात जाळून घेतले. याच खड्ड्यात तो राहात असे. साधारण पाच फूट खोल खड्ड्यात त्याने गवत आणि पेट्रोल आधीपासून जमा करून ठेवले होते. शुक्रवारी दुपारी ही मुलगी या खड्ड्याजवळील रस्त्यावरून जात असताना किस्तूराम याने तिला पकडून खड्ड्यात टाकले. यानंतर त्याने स्वतःही खड्ड्यात उडी मारून आग लावली. या आगीत जिवंत होरपळून दोघांचाही मृत्यू झाला.

राजस्थान क्राईम न्यूज
राजस्थान क्राईम न्यूज

By

Published : Dec 12, 2020, 1:44 PM IST

बाडमेर (राजस्थान) - बाडमेरच्या सरहदी येथील एका कथित तांत्रिकाने काही धार्मिक विधीचा भाग म्हणून शुक्रवारी आठ वर्षांच्या मुलीसह स्वत:ला जाळून घेतले. ही बातमी कळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले. बाखासर येथील पोलीस अधिकारी निम्बसिंह यांनी याविषयी माहिती दिली.

निवाड येथील भील किस्तूराम याने एका आठ वर्षांच्या मुलीसह स्वतःला जमिनीत केलेल्या एका खड्ड्यात जाळून घेतले. याच खड्ड्यात तो राहात असे. साधारण पाच फूट खोल खड्ड्यात त्याने गवत आणि पेट्रोल आधीपासून जमा करून ठेवले होते. शुक्रवारी दुपारी ही मुलगी या खड्ड्याजवळील रस्त्यावरून जात असताना किस्तूराम याने तिला पकडून खड्ड्यात टाकले. यानंतर त्याने स्वतःही खड्ड्यात उडी मारून आग लावली. या आगीत जिवंत होरपळून दोघांचाही मृत्यू झाला.

हेही वाचा -आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे 72 वे वर्ष!

मृत मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेतील तांत्रिक किस्तूराम मानसिक रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, तो 2014 मध्ये व्हिसावर भारतात आला होता आणि तो अवैधपणे भारतातच राहिला होता, असेही येथील लोकांचे म्हणणे आहे. तो शेतात काम करण्यासाठी मजूर म्हणून आला होता, असेही सांगण्यात येत आहे. तो मागील दोन वर्षांपासून निवाडच्या आसपास फिरत असे. त्याने स्वतःला राहण्यासाठी एका शेतात खड्डा तयार केला होता. या खड्ड्यातच त्याने मुलीसह स्वतःला जाळून घेतले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा -शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचं नुकसान, 'UNICEF' संस्थेनं दिला 'हा' इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details