लखनौ - उत्तर प्रेदेशात बरेली जिल्ह्यातील विशेष न्यायालयाने गुरुवारी(10 जानेवारी) अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपींना प्रत्येकी 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी दोघांना फाशीची शिक्षा
29 जानेवारी 2016ला ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलगी संध्याकाळी घरी परत न परतल्याने शोध घेत असताना तिचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अत्याचार करून नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी, पोलिसांनी मुरारीलाल आणि उमाकांत या आरोपींना अटक केली होती.
प्रातिनिधीक छायाचित्र
हेही वाचा - 'जेवताना मोबाईलवर बोलू नको', वडिलांनी बजावल्यामुळे तरुणीची आत्महत्या
29 जानेवारी 2016ला ही घटना घडली होती. अल्पवयीन मुलगी संध्याकाळी घरी परत न परतल्याने शोध घेत असताना तिचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदन अहवालात तिच्यावर अत्याचार करून नंतर गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी, पोलिसांनी मुरारीलाल आणि उमाकांत या आरोपींना अटक केली होती. 2017 मध्ये याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.