मुझफ्फरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी पत्र लिहले होते. त्या मान्यवरांविरूध्द मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.
लेटर वॉर: मोदींना पत्र लिहेल्या त्या मान्यवरांविरूध्द देशद्रोहाचा खटला दाखल - साहित्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी पत्र लिहले होते. त्या मान्यवरांविरूध्द मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे.

वकील सुधीर कुमार ओझा यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांच्याकडे खटला दाखल केला आहे. देशाची प्रतिमा आणि हिंसा भडकवण्याच्या हेतूने त्यांनी ते पत्र लिहल्याचा आरोप सुधीर ओझा यांनी केला आहे. यावर 3 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
23 जुलैला देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यामध्ये मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश होता.