बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय व्हायरल, लष्काराचा सतर्कतेचा इशारा - भारताचे सरसेनाध्यक्ष
भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिपिन रावत
नवी दिल्ली -भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) बिपिन रावत यांच्या नावाने एक बनावट पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतीय लष्कराचे जनसंपर्क शाखेने संबधित पत्र हे बनावट असल्याचे म्हटले आहे.
नुकतचं लष्करप्रमुख बिपिन रावत यांची भारताचे सरसेनाध्यक्ष म्हणजेच 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' (सीडीएस) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा समितीने मंगळवारी सीडीएस या पदाला मंजुरी देत रावत यांच्या नावाची घोषणा केली. सरसेनाध्यक्ष म्हणजेच त्यांना 'फोर स्टार जनरल'चा मान मिळाला आहे.