पाटना - बिहारमध्ये राजकीय संघर्ष सुरू असून विरोधकांमध्ये पोस्टर्स वॉर सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात शहरात पोस्टर्स लागली आहेत.
यापूर्वी राष्ट्रीय जनता दल पक्षाने पोस्टर्सच्या माध्यमातून बिहार सरकावर टीका केली होती. राजदने पोस्टरवर रेल्वे इंजिनच्या जागी मुख्यमंत्री नितिश कुमार यांचे छायाचित्र तर दुसरीकडे दुसऱ्या रेल्वे इंजिनच्या जागी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचे छायाचित्र लावले होते. पोस्टरवर 'बिहारचं वाटोळं करणारे ट्रबल इंजिन', लूट एक्सप्रेस आणि झूठ एक्सप्रेस असे लिहिले होते.
हेही वाचा -दिल्लीत वायफाय बरोबर तुमचा मोबाईल चार्ज करायची पण सोय, केजरीवाल-शाह ट्विटर वॉर