नवी दिल्ली/नोएडा - दिल्ली लगतच्या जनपद नोएडा येथील जीआईपी मॉलमध्ये विमानाच्या आत उपहारगृह सुरू होणार आहे. याद्वारे नागरिकांना चविष्ट पदार्थांचा आनंद तर घेता येईलच शिवाय विमानाबद्दल देखील जाणून घेता येणार आहे. हे उपहारगृह १५ डिसेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे.
शिक्षण आणि मनोरंजन या संकल्पनेवर या उपहारगृहाची निर्मिती होत आहे. ज्या मुलांना विमानाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी या उपहारगृहात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, ज्या नागरिकांना विमानातून प्रवास करणे परवडत नाही, अशांना लक्षात घेऊन या उपहारगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. उपहारगृहात एकावेळी ५० नागरिकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जीआईपी मॉलचे सहकारी संचालक (विपणन) शमीम यांनी दिली.