मुझफ्फरपूर -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी पत्र लिहले होते. त्या मान्यवरांविरूध्द मुझफ्फरपूरच्या दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावरून आज एफआयआर दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
लेटर वॉर: मोदींना पत्र लिहेल्या 'त्या' मान्यवरांविरूध्द एफआयआर दाखल - 49 eminent citizens
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉब लिंचिंगच्या घटनेवरून 49 मान्यवरांनी पत्र लिहले होते. त्या मान्यवरांविरूध्द एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
वकील सुधीर कुमार ओझा यांनी 20 ऑगस्टला मुख्य न्यायदंडाधिकारी सूर्यकांत तिवारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती.
आहे. देशाची प्रतिमा आणि हिंसा भडकवण्याच्या हेतूने मान्यवरांनी पत्र लिहल्याचा आरोप सुधीर ओझा यांनी केला होता.
23 जुलैला देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. त्यामध्ये मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील 49 जणांचा समावेश होता.