इंफाळ - आपण लावलेल झाड तोडल म्हणून मणिपूर राज्यातील एका मुलीचा रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्ही एलंगबाम असे त्या मुलीचे नाव असून ती इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे.
व्ही.एलंगबाम शाळेतून घरी येत होती. त्यावेळी तिला आपण चारवर्षांपूर्वी लावलेले झाड तोडलेल दिसलं. ते पाहून ती रडायला लागली. तिचा रडतानाचा व्हिडिओ इतका व्हायरल झाला की, तो राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचला. मुख्यमंत्री एन वीरेन सिंह यांनी व्ही.एलंगबामचे झाडावरचे प्रेम पाहून तिला थेट 'मुख्यमंत्री ग्रीन मणिपूर मिशन' चे ब्रँड अॅम्बेसेडरच केले आहे.
एलंगबामचे झाडावरचे प्रेम पाहून तीला 'मुख्यमंत्री ग्रीन मणिपूर मिशन' चे ब्रँड अॅम्बेसेडर केले आहे.
मणिपूरमधील काकिंग जिल्ह्यातील हयांगलाम माचा लीकाई या गावात एलंगबाम राहते. ती म्हणाली 'मी चारवर्षांपूर्वी ते झाड लावले होते. त्यांच्यावर मी माझ्या लहान भावाप्रमाणे प्रेम करायचे. मी शाळेतून घरी येत होते. तेव्हा मला ते झाड तोडलेल दिसलं. हे पाहून मला खुप वाईट वाटले', त्यामुळे तिला रडू कोसळल्याचेही ती सांगते. भविष्यात तिचे वन अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
भविष्यात वन अधिकारी होण्याचे स्वप्न
वृक्षारोपण करून प्रत्येकाने वृक्षाची जोपासना करणे ही काळाची गरज आहे. वृक्ष लागवडीने वनक्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने शासन वृक्ष रोपन अभियान राबवत आहे.
इंफाळ ही मणिपूर राज्याची राजधानी येथील सर्वात मोठे शहर आहे. इंफाल शहर साधारण मणिपूरच्या मध्य भागात इंफाल नदीच्या काठावर वसलेलं आहे. २०११ साली २.६८ लाख लोकसंख्या असलेले इंफाळ ईशान्य भारतामधील एक आघाडीचे शहर मानले जाते.