वायनाड-श्रीलंकेतील जंगलात तब्बल 116 वर्षानंतर सापडलेल्या नव्या पिग्मी ट्वीग हॉपर प्रजातीला केरळमधील युवा भारतीय तरूण संशोधक धनीष भास्कर यांचे नाव देण्यात आले. त्या प्रजातीचे ‘क्लाडोनोटस भास्करी’ असे नामकरण करण्यात आले आहे.
श्रीलंकेत सापडलेल्या गवतावरील नव्या प्रजातील भारतीय संशोधक धनीष भास्कर यांचे नाव
जर्मनी आणि क्रोएशियाच्या संशोधकांनी श्रीलंकेच्या सिंहराज रेन फॉरेस्टमध्ये नुकतीच ट्वीग हॉपरची एक नवीन प्रजाती शोधली.त्या प्रजातीचे नाव धनीष भास्कर यांच्या नावावरुन ठेवत त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला गेला.
वायनाडमधील पाडिनजरेथारा येथील रहिवासी असलेल्या धनीष भास्कर यांनी भारतातील गवतावरील किड्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. जर्मनी आणि क्रोएशियाच्या संशोधकांनी श्रीलंकेच्या सिंहराज रेन फॉरेस्टमध्ये नुकतीच ट्वीग हॉपरची एक नवीन प्रजाती शोधली. त्या प्रजातीचे नाव धनीष भास्कर यांच्या नावावरुन ठेवत त्यांच्या संशोधनातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला. क्लॉडोनोटस भास्करी या प्रजातीला उडता येत नाही. केवळ पावसाच्या जंगलात ही प्रजाती आढळते.
धनीष आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेचे सदस्य आहेत. प्रजाती सर्व्हायव्हल कमिशन (आयसीसी) नावाच्या ग्रास होपर तज्ञांच्या गटाचे देखील ते सदस्य आहेत. केरळ वन संशोधन संस्थेसोबतही ते संशोधक म्हणून काम करत आहेत. धनीष भास्कर एरविकुलम नॅशनल पार्क येथे मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या आगीमुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामावर अभ्यास करत आहेत. प्रजातीचे नाव धनीष भास्कर यांच्या नावावरुन ठेवल्याने धनीष आनंदित झाला आहे. धनीष पडिनजारथरा सुमती आणि भास्करन यांचा मुलगा आहे. अरुणिमा ही त्यांची पत्नी आहे.