सिमडेगा- जलडेगा ठाणा क्षेत्रातील बेंदोचुआमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. ही चकमक पीएलएफआईचा कमांडर सचित सिंह आणि तिलकेश्वर गोप यांच्यासोबत झाली आहे. यात एक पंडित नक्षलवादी मारला गेला आहे. तर, प्रवीण कंडुलना नावाचा नक्षली चकमकीदरम्यान लागलेल्या पोलिसांच्या गोळीने गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल केले गेले आहे. याशिवाय पाच नक्षल्यांना अटक केली आहे. यात दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.
सिमडेगामध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार, तर एक गंभीर; पाच जणांना अटक - naxalite was injured in an encounter in Simdega
जलडेगा ठाणा क्षेत्रातील बेंदोचुआमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. तर, प्रवीण कंडुलना नावाचा नक्षली चकमकीदरम्यानच्या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे.
सिमडेगामध्ये चकमकीत एक नक्षलवादी ठार
चकमकीदरम्यान दहशतवाद पसरवणाऱ्या पीएलएफआई एरिया कमांडर जॉनसन बारलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोहिमेचे एसपी निर्मल गोप यांनी हे एक मोठे यश असल्याचे म्हटले आहे. ही चकमक रविवारी पहाटे साडेचार वाजता सुरू झाली. यात जिल्हा पोलीस कर्मचार्यांसह पोलीस अधिकारीही सामील झाले होते.