सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील तोंगपाल येथील दामनकोटा क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने एका नक्षलवाद्याचा खात्मा केला. सुकमा पोलीस अधीक्षक शलभ सिन्हा यांनी माहिती दिली.
छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा - छत्तीसगडमधील चकमकीत नक्षलवाद्याचा खात्मा
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील तोंगपाल येथील दामनकोटा क्षेत्रामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलाने एका नक्षलवाद्याचा खात्मा केला.
A naxalite killed in police naxalite encounter in Sukma
शनिवारी सायंकाळी साडे सहा ते सात दरम्यान नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. ज्याला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यामध्ये एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला. त्याचा मृतदेह देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे. याचबरोबर घटनास्थळावरून 315 बोर बंदूक आणि शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या चकमकीनंतर आसपासच्या परिसरात जवानांची शोधमोहीम सुरूच होती.