विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) - लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर सर्वाधिक फटका देशातील असंघटीत क्षेत्राला बसला. यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत सर्वाधिक कामगार आणि मजूर वर्ग भरडला गेला. शहरातील व्यवसाय आणि उद्योग बंद झाल्याने कामगारांच्या हातचे काम गेले, आणि हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली. या दरम्यान हजारो कामगारांनी स्वत:चे गाव जवळ करण्यास सुरुवात केली. देशभरातील परिवहन बंद असल्याने कामगारांनी चालत अंतर कापायला सुरुवात केली. यामध्ये अनेकजण सायकलवर देखील निघाले आहेत.
संघर्ष जगण्यासाठीचा... दिव्यांग वृद्ध कामगाराचा आंध्र ते उत्तर प्रदेश तीनचाकी सायकलवर प्रवास - migrants in uttar pradesh
उद्योग बंद झाल्याने कामगारांच्या हातचे काम गेले; आणि हातावर पोट असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली. या दरम्यान हजारो कामगारांनी स्वत:चे गाव जवळ करण्यास सुरुवात केली. आंध्र प्रदेशच्या राजामुंद्री येथे काम करणाऱ्या एका दिव्यांग कामगाराने तिनचाकी सायकलवर उत्तरप्रदेशातील गाव जवळ करण्यास सुरुवात केली.
आंध्र प्रदेशच्या राजामुंद्री येथे काम करणाऱ्या एका दिव्यांग कामगाराने तीनचाकी सायकलवर उत्तरप्रदेशातील गाव जवळ करण्यास सुरुवात केली. संबंधित वृद्ध रामसिंग आंध्र प्रदेशात पर्फ्युम्स विकण्याचे काम करतात. यावरच त्यांचा उदर्निर्वाह चालतो. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर त्यांचा धंदा बंद झाला. पोटापाण्यासाठी जवळ असणारे पैसे देखील संपल्याने या वृद्धावर उपासमारीची वेळ आली. मात्र, उद्भवलेल्या परिस्थितीला मोठ्या जिद्दीने तोंड देत त्यांनी तीनचाकी सायकलवर उत्तरप्रदेश गाठण्याचे ठरवले.
मागील तीन दिवसांपासून ते या सायकलवर प्रवास करत आहेत. सध्या रामसिंग हे विशाखापट्टणममध्ये आहेत. अद्याप त्यांचा प्रवास थांबलेला नाही. सोबत थोडे कपडे, खाण्याचे पदार्थ आणि एक पाण्याची बाटली घेऊन ते रस्ता कापत आहेत.