कोलकाता -मुले चोरणारी व्यक्ती असल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. पश्चिम बर्धमान जिल्ह्यातील सालनपूर येथे ही घटना घडली आहे.
मारहाणीचा व्हायरल झालेला व्हिडिओ हेही वाचा -नक्षलवाद्यांचा दोन माजी सहकाऱ्यांवर गोळीबार; एक गंभीर जखमी तर एकाचे अपहरण
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत गावकरी संशयित व्यक्तीला खांबाला बांधून मारहाण करताना दिसत आहेत. त्या व्यक्तीला जमावाने लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -भाजपची आज तिसरी मेगाभरती, हर्षवर्धन पाटलांसह गणेश नाईकांचा प्रवेश