महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोनाच्या धास्तीने एकाचा आत्महत्येचा प्रयत्न; गळ्याची नस कापल्याने प्रकृती गंभीर - उत्तराखंड न्यूज

कोरोनाची लागण झाल्याच्या भितीने एका व्यक्तीने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. बेरिनाग जिल्ह्यात घडलेल्या या घटनेतील संबंधिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

uttrakhand corona news
कोरोनाची लागण झाल्याच्या भितीने एका व्यक्तीने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

By

Published : Apr 1, 2020, 6:11 PM IST

उत्तराखंड - कोरोनाची लागण झाल्याच्या भितीने एका व्यक्तीने गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. बेरिनाग जिल्ह्यात घडलेल्या या घटनेतील संबंधिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. जीवन सिंह (वय-४५) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांना रोगाची लागण झाल्याचे अद्याप अस्पष्ट आहे.

जीवन गंगोलीहाट पोस्ट लाईन येथे कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. मंगळवारी (३१मार्च) संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याने स्वत: ला खोलीत बंद केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. यानंतर त्याने गळ्याची नस कापली. ओरडण्याचा आवाज आल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडला. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालात दाखल केले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने डॉक्टरांनी त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णालयात नेण्याचे सूचवले. सध्या प्रकृती गंभीर असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे अस्पष्ट आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details