नवी दिल्ली - संसद परिसरात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या वाहनांचा ताफा एका व्यक्तीने अडवला. ईश्वरदास गुप्ता असे या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानकपणे घडलेल्या या घटनेने संसद परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता.
एकाने अडवला चक्क संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा ताफा अन् म्हणाला.. - राजनाथ सिंहांचा ताफा अडवला
माझे आधार कार्डवरील नाव बदलायचे आहे, त्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटायचे आहे, असे म्हणत तो वारंवार मोदींना भेटण्याची विनंती करत होता.
![एकाने अडवला चक्क संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांचा ताफा अन् म्हणाला.. A man came in front of Defence Minister Rajnath Singh's convoy](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5256100-188-5256100-1575372995235.jpg)
दिल्लीत राजनाथ सिंहांचा ताफा अडवला
हेही वाचा -देशभरातील ठळक घडामोडींवर एक नजर...
माझे आधार कार्डवरील नाव बदलायचे आहे, त्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी भेटायचे आहे, असे म्हणत तो वारंवार मोदींना भेटण्याची विनंती करत होता. ३५ वर्षीय हा व्यक्ती उत्तर प्रदेशमधील कुशीनगरचा रहिवासी आहे. त्याचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला ताब्यात घेऊन संसद रस्ता पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा ताफा अडवला
Last Updated : Dec 3, 2019, 6:46 PM IST
TAGGED:
राजनाथ सिंहांचा ताफा अडवला