भोपाळ - स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान गांधीजींनी जबलपूर ते दामोह अशी यात्रा केली होती. या यात्रेदरम्यान त्यांनी अनेक गावांमध्ये सभा घेतल्या. दामोहमधील अनेक जागांना गांधींच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत.
दामोहमधील गांधीजींनी वास्तव्य केलेले घर; आज आहे दुर्लक्षित... खेमचंद बजाज, एक अज्ञात स्वातंत्र्य सैनिक सांगतात, गांधीजींनी २९ ऑक्टोबर १९३३ ला दामोहमध्ये एक सभा घेतली होती. त्यांच्या आठवणीत, गांधींचे स्मारक म्हणून एक व्यासपीठ उभारले आहे.
यादरम्यान गांधीजी ज्या घरात राहिले, ते एका गुजराती कुटुंबाचे घर होते. हे घर आजही उभे आहे. मात्र दुर्दैवाने, पूर्णपणे दुर्लक्षित अशा स्थितीत.
जेव्हा गांधीजींनी दामोह शहराला भेट दिली होती, तेव्हा शहरातील कापड व्यापाऱयांनी त्यांच्या सन्मानार्थ शहरातील रस्ते कापडांनी झाकले होते. यामुळेच, शहरातील गांधी चौक परिसरात आजही कापड बाजार आहे.
हेही पहा : ग्वाल्हेर : गांधी हत्येच्या कटाचे पाप माथी असलेले शहर