महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लोणावळा-कर्जत दरम्यान मालगाडीचे डबे घसरले; मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत

आज पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

लोणावळा-कर्जत दरम्यान मालगाडीचे डबे घसरले

By

Published : Jul 1, 2019, 7:57 AM IST

Updated : Jul 1, 2019, 1:51 PM IST

मुंबई -आज पहाटे साडेचारच्या सुमारास मुंबई पुणे रेल्वे मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याची घटना घडली आहे. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


कर्जतजवळील घाट परिसरातील जामरुंग व ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे काही डबे घसरले आहेत. या अपघातामुळे मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मालगाडीचे ५ ते ६ डबे घसरल्याचीही माहिती समोर आली आहे.

लोणावळा-कर्जत दरम्यान मालगाडीचे डबे घसरले


या ठिकाणी हे डबे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या अपघातामुळे लांब पल्ल्याच्या मुंबईहून पुणेमार्गे जाणाऱ्या ट्रेन्स या इगतपुरी मार्गे वळवण्यात आल्या आहेत. तर भुसावळ ते पुणे एक्स्प्रेसची यात्रा नाशिक रोड स्थानकात संपवण्यात आल्या असल्याची माहिती मध्य रेल्वेने ट्विटरद्वारे दिली आहे. इतर दोन लाईन सुरू असून बाधित लाईनच काम पूर्ण होत आल्याचं पीआरोनी सांगितले आहे.


या गाड्या झाल्या रद्द -

  • मुंबई - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
  • मुंबई- पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस
  • मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस
  • कोल्हापूर कोयान एक्स्प्रेस मुंबई - पुणे
  • पुणे - भुसावळ एक्स्प्रेस
  • पनवेल - पुणे पॅसेंजर
  • पुणे - सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस
  • पुणे - सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस

मार्गात बदल केलेल्या एक्स्प्रेस -

  • सीएसएमटी-बंगळुरु उद्यान एक्सप्रेस
  • कल्याण-इगतपुरी-मनमाड एक्स्प्रेस
  • अहमदाबाद-पुणे दुरांत एक्स्प्रेस
  • इंदूर-पुणे एक्स्प्रेस

थांबवलेल्या एक्स्प्रेस -

  • हुजूर साहिब - (पनवेल न जाता पुण्यात थांबवली)
  • भुसावळ - पुणे (नाशिक मध्ये थांबली)
  • हमसफर एक्सप्रेस - (पनवेलमध्ये थांबली)
Last Updated : Jul 1, 2019, 1:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details