आपण युद्ध करत आहोत. संपूर्ण जगभर कोरोना विषाणुशी लढा देत असताना, आपण जे काही पहात आहोत, त्याचे वर्णन करण्यासाठी यापेक्षा दुसरा पर्याय नाही. शत्रू अदृष्य असेल, पण तो भारताने या अगोदर ज्या शत्रुंचा सामना केला आहे, त्यापेक्षाही भयानक आहे. हे युद्ध अखेर किती मानवी बळी घेणार, हे आम्हाला माहित नाही, पण आमच्या राष्ट्रीय कल्याणात, आमच्या आयुष्याच्या मार्गात आणि संभवतः आमच्या भविष्यातही त्याने नक्कीच अडथळा आणला आहे.
पूर्वी, युद्धे ही गणवेषातील लोकाकंडून लढली जात आणि भारतीय लोकांना, बहुतेक वेळा त्याची झळ लागत नसे. आता ते सर्व काही बदलले आहे आणि आज प्रत्येक नागरिकाला सैनिक व्हावे लागत आहे. नागरिकापासून नागरिक-सैनिक असे हे संक्रमण सोपे असणार नाही कदाचित आणि लष्करी आयुष्यातील काही धडे मार्गदर्शन करतील.
जेव्हा पायदळातील एखादा सैनिक शत्रुच्या ठिकाणावर हल्ला करतो, तेव्हा तोफखान्यातील बंदूकधाऱ्यांनी आघाडीच्या मागे १५ किलोमीटर अंतरावर हजारो उच्च स्फोटक अशा तोफगोळ्यांनी शत्रुला धक्का देण्यासाठी त्या भागात अगोदरच भडिमार केलेला असतो. पायदळातील सैनिकांची कमीत कमी हानी व्हावी, या हेतूने अभियंत्यांनी सुरंगक्षेत्रातून रस्त्यावर स्फोट घडवलेला असतो आणि मागील तळावर असलेल्या पुरवठा करणार्यांनी दारूगोळा, अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा लढाऊ सैनिकापर्यंत पोहोचेल, याची सुनिश्चिती केलेली असते. जर प्रत्येक माणसाने आपले कर्तव्य चोख बजावले नाही तर, युद्धात पराभव निश्चितच असतो.
आज आपण अशा स्थितीला सामोरे जात आहोत की जेथे आघाडी आणि सुरक्षित क्षेत्रे नाहीत, गरिब-श्रीमंत फरक नाही. आमचे डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस अधिकारी आणि आणिबाणीकालीन कर्मचारी कोरोना विषाणुविरोधात लढाई करत असताना, प्रत्येक नागरिकाने त्यांच्यावरील बोजा कमी करण्यासाठी समर्थक सैनिक बनले पाहिजे.
दक्षिण कोरियात, २० जानेवारीला पहिला कोरोना विषाणुचा रूग्ण आढळला आणि ४ आठवड्यांनंतर, फक्त ३० रूग्ण होते. ३१ क्रमांकाची रूग्ण, अशी जिला कुख्याती आता मिळाली आहे, तिने सुरूवातीच्या परिक्षेला नकार दिला आणि तिचे सामाजिक कार्य सुरूच ठेवले. ज्या शिंचेओंजी चर्चच्या इमारतींच्या समूहात तिने हजेरी लावली, तेथे दक्षिण कोरियातील ६० टक्के रूग्ण आढळले आहेत. जर एखादा घसरला तर, आम्ही सर्वजण लढाई हरणार आहोत, हा स्पष्ट धडा यावरून मिळतो.
लष्करी लढा हा परिणामकारक ठरण्यामागील एक घटक आज्ञांना स्पष्टपणे चिकटून राहणे हा आहे. सॅम्युअल हटिंग्टनने आज्ञाधारकपणा हा सर्वोच्च लष्करी सद्गुण असल्याचे म्हटले आहे. जर त्वरित आज्ञापालन पुढे येत नसेल तर, युद्धे लढली जाऊ शकत नाहीत, जिंकली जाण्याचे प्रमाण तर त्याहून कमी असते. या कोरोना विषाणुच्या विरोधातील लढ्यात, आमची अंतःक्रय संपूर्ण असली पाहिजे आणि कटिबद्धता दृढतापूर्वक असायला हवी. टिकाकार आणि उत्तरदायित्व यांच्यासाठी योजना खुल्या असू शकतील, पण आम्ही सामोरे जात असलेल्या धोक्याच्या स्वरूपामुळे निष्क्रियतेची किमत तीव्रतेने वाढणार आहे.
या पेचप्रसंगाच्या काळात आमच्या राजकीय नेत्यांनी घेतलेले निर्णय चुकीचे होते की बरोबर हे काळच ठरवेल, पण निर्णयांवर चर्चा करण्याची ही वेळ नाही. व्यवस्थेवर विश्वास असला पाहिजे आणि शत्रुला पराभूत करण्यासाठी आम्ही निघालो असताना एकत्रितपणे कृती केली पाहिजे.