नवी दिल्ली - काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना दिल्ली रॉउज अव्हेन्यू न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना उपचारासाठी आणि व्यवसायिक कामांसाठी विदेशात जाण्याची परवानगी दिली आहे.
रॉबर्ट वाड्रांना न्यायालयाचा दिलासा, परदेशात जाण्याची दिली परवानगी - Court allowed Robert Vadra to travel abroad
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना दिल्ली रॉउज अव्हेन्यू न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.
भूखंड अधिग्रहण प्रकरणातील आरोपी असलेले रॉबर्ट वाड्रा सध्या जामिनावर बाहेर आहेत. वाड्रा यांना दोन आठवड्यांसाठी स्पेनला जायचे आहे. त्यासाठी त्यांनी शनिवारी दिल्ली न्यायालयात परदेशात जाण्याची परवानगी देणारी याचिका दाखल केली होती.
यापूर्वी जूनमध्ये रॉबर्ट वाड्रा यांना उपचारासाठी अमेरिका आणि नेदरलँडला जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना इंग्लंडमध्ये जाण्याची परवानगी दिली नव्हती. रॉबर्ट वाड्रा यांची सध्या मनी लाँड्री प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने रॉबर्ट वाड्रा यांची अनेकदा चौकशी केली आहे.