एटा - उत्तरप्रदेशातील एटा येथे नगर कोतवाली भागातील जीटी रोड गौशाळेजवळ सोमवारी एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. मृतदेहाजवळ एक आधार कार्ड सापडले आहे. यावर महाराष्ट्राचा पत्ता लिहिलेला आहे.
उत्तरप्रदेशातील एटात आढळला मृतदेह, आधार कार्डवर महाराष्ट्राचा पत्ता - उत्तरप्रदेशात आढळला मृतदेह
मृतदेहाजवळ एक छोटा चाकू आणि विषाचे रिकामे पाकीट आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
उत्तरप्रदेशातील एटात आढळला मृतदेह, आधार कार्डवर महाराष्ट्राचा पत्ता
याशिवाय मृतदेहाजवळ एक छोटा चाकू आणि विषाचे रिकामे पाकीट आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. मृताची ओळख पटण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. मृतदेहाजवळ आढळून आलेल्या आधार कार्डवर अलीम बशीर शेख नाव लिहिलेले आहे. आद्याप मृत्यूचे कारणही समजलेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे डॉ. देवा आनंद (सीओ सिटी) यांनी म्हटले आहे.