महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO : बेळगावातील महापुरापासून बचाव करण्यासाठी मगरीने घेतला घराच्या छतावर आसरा - कर्नाटक पूर

बेळगावातील रायबाग तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. येथील नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मगरी नागरी वस्तीत आल्याचे दिसून आले. मगर घराच्या छतावर बसल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मगरीचा छतावर आसरा

By

Published : Aug 12, 2019, 7:28 PM IST

बंगळुरू- महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यातदेखील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. बेळगाव जिल्हात पुरामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले असून सखल भागातील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत, पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पशु-पक्षी, जनावरांना सुद्धा पुराचा सामना करावा लागत आहे. पुरामुळे नदीतील मगरी गावांमध्ये शिरत असल्याचे दिसत आहे.

बेळगावातील रायबाग तालुक्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. येथील नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मगरी नागरी वस्तीत आल्याचे दिसून आले. एक मगर घराच्या छतावर बसल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पुराच्या वाहत्या पाण्यातून आसरा घेण्यासाठी या मगरीने घराच्या छताचा आधार घेतल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्र, गुजरातसह पूरग्रस्त ४ राज्यांमध्ये सध्या पुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचावकार्य वेगात सुरू आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार ३ हजार जवान ४ राज्यांमधील विविध १५ जिल्ह्यांमध्ये बचावकार्य करत आहेत. जवळपास ३५ हजार लोकांना जवानांनी सुरक्षित स्थळी दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details