पाटणा - काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याविरोधात मुजफ्फरपूर सीजेएम कोर्टात गुन्हा दाखल झाला आहे. वकिल सुधीर ओझा यांनी हा खटला दाखल केला आहे.
पेहलू खान प्रकरण : प्रियंका गांधींच्या विरोधात मुजफ्फरपूर कोर्टात गुन्हा दाखल
काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याविरोधात मुजफ्फरपूर सीजेएम कोर्टात गुन्हा दाखल झाला आहे. जमावाने मिळून एखाद्या व्यक्तीचा खून करणे हा एक घोर अपराध आहे', असे टि्वट प्रियंका यांनी केले होते.
देशभर गाजलेल्या राजस्थानातील पेहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर न्यायालयाने बुधवारी निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निर्णयावर 'पेहलू खान प्रकरणातील लोअर कोर्टाचा निर्णय धक्कादायक आहे. आपल्या देशात अमानुषपणाला स्थान नसावे. जमावाने मिळून एखाद्या व्यक्तीचा खून करणे हा एक घोर अपराध आहे', असे टि्वट प्रियंका यांनी केले होते.
पेहलू खान, त्यांची दोन मुले आणि काही जण १ एप्रिल २०१७ रोजी जयपूरमधून गायी घेऊन हरयाणातील आपल्या गावी निघाले होते. यावेळी गोतस्करी करत असल्याच्या संशयातून या सर्वाना गोरक्षकांनी बेदम मारहाण केली होती. त्यात पेहलू खान यांचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला.