महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

तेलंगणामध्ये एका कंपनीद्वारे सॅनिटायझर आणि मास्कचे मोफत वितरण - आरोग्य आणि कल्याण कुटूंब मंत्रालय

'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉक डाऊन करण्यात आले. मात्र, अशा कठीण परिस्थितीत देखील काहीजण त्यांचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसंरात्र काम करताहेत. त्यांच्यासाठी 'सनराईस डायग्नोस्टीक सेंटर' ही कंपनी सॅनिटायझर आणि मास्क तयार करून मोफत वाटप करत आहे.

तेलंगणामध्ये एका कंपनीद्वारे सॅनिटायझर आणि मास्कचे मोफत वितरण
तेलंगणामध्ये एका कंपनीद्वारे सॅनिटायझर आणि मास्कचे मोफत वितरण

By

Published : Apr 2, 2020, 9:11 AM IST

हैदराबाद -सध्या देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून सुरक्षा आणि स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचा तुटवडा आहे. अशातच तेलंगणा राज्यातील 'सनराईस डायग्नोस्टीक सेंटर' या वैज्ञानिक इंस्ट्रुमेंट कंपनी सध्या सॅनिटायझर आणि मास्क बनवण्यात गुंतली आहे. कोरोना संसर्गासारख्या महामारीदरम्यान आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्यांसाठी ते मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत.

या कंपनीचे लॅब कोऑर्डिनेटर एव्हीएस जगन्नाथराव म्हणाले, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉक डाऊन करण्यात आले. मात्र, अशा कठीण परिस्थितीत देखील काहीजण त्यांचा जीव धोक्यात घालून कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसंरात्र काम करताहेत. आम्ही त्यांच्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क तयार करण्याचे काम सुरू केले आहे'.

स्वयंसेवक असलेले मोहम्मद रफी म्हणाले, 'सनराईस डायग्नोस्टीक सेंटर' यांच्याकडून मला एक सॅनिटायझर आणि मास्क देण्यात आला. त्यांनी आमचा आणि आमच्या तब्येतीच्या काळजीपोटी जी साधनं उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे'.

देशात सध्या कोरोना विषाणूचे १,८३४ पॉझिटिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १४४ जण या आजारातून बरे झाले असल्याची माहीती, बुधवारी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कल्याण कुटूंब मंत्रालयाकडून देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details