महाराष्ट्र

maharashtra

काँग्रेसमधील पक्ष नेतृत्वाच्या संघर्षाचा इतिहास, 'या'वेळी झाले होते वाद

By

Published : Aug 24, 2020, 3:59 PM IST

काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पत्राद्वारे पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. पत्रात सोनिया किंवा राहुल गांधी यांच्यावर प्रत्यक्ष टिप्पणी करण्यात आलेली नाही. मात्र, जनतेशी संपर्कात राहणाऱ्या सक्रिय नेतृत्वाची पक्षाला गरज असल्याचे पत्रात म्हटले आहे. अशीच परिस्थिती पक्षात यापूर्वी देखील अनेक वेळा उद्धभवलेली आहे.

काँग्रेस
काँग्रेस

नवी दिल्ली - काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाचा वाद नवीन नाही. यापूर्वीदेखील पक्ष नेतृत्वावरून पक्षात अनेक वेळा वादंग माजलेले आहेत. मागील ६ वर्षांपासून काँग्रेस पक्ष सत्तेत नाही. पक्षाच्या इतिहासात असे दुसऱ्यांदाच घडले आहे. यापूर्वी १९९६ ते २००४ या काळात पक्ष सत्तेबाहेर होता.

काँग्रेस पक्षातील नेतृत्त्व वाद -

  • सोनिया गांधी -

1999च्या लोकसभा निवडणुकीआधी शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारीक अनवर यांनी बंडाचे निशाण उठवले होते. मात्र, यानंतर या नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

याचप्रणाणे त्यांना १९९८मध्ये सिताराम केसरी, १९९०मध्ये नरसिंह राव यांचा देखील विरोध सहन करावा लागला होता.

  • राजीव गांधी -

१९८७मध्ये पक्ष सत्तेत असताना त्यांना अशाच प्रकारच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. व्ही. पी. सिंह जे त्यांच्याच सरकारमधील आधी अर्थमंत्री आणि नंतर रक्षामंत्री होते, त्यांनी सत्तेत राहून सरकारला भ्रष्टाचारासंदर्भात प्रश्न विचारले होते. यानंतर व्ही. पी. सिंह यांना आधी मंत्रिमंडळातून आणि नंतर पक्षातून बाहेर करण्यात आले होते.

  • इंदिरा गांधी -

१९६७मध्ये इंदिरा गांधी आणि सिंडेकेट यांच्यामधील वाद समोर आला. यावेळी इंदिरा गांधींनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांच्या मागे उभे राहणे पसंद केले.

१९७७मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषीत केल्याने पक्षासमोर मोठे संकट उभे राहिले. यावेळी पक्ष अध्यक्ष के. ब्राह्मानंद रेड्डी आणि संसदेचे नेते यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात उभे राहणे पसंत केले. यामुळे पक्ष फुटला.

जगजीवन राम आणि एच. बहुगुणा यांच्यासारख्या काँग्रेसमधील मोठ्या नेत्यांनी 'कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी' या नवीन पक्षाची स्थापना केली. यामुळे ऐन निवडणुकीपूर्वीच पक्ष फुटला होता.

  • जवाहरलाल नेहरू -

पुरुषोत्तम दास टंडन, के. एम. मुंशी आणि नरहर विष्णू गाडगीळ यांच्या आव्हानाविरूद्ध जवाहरलाल नेहरूंना संघर्ष करावा लागला होता. सप्टेंबर १९५०मध्ये AICCच्या अधिवेशनात टंडन यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला होता. स्वतंत्र भारतात अध्यक्ष पदासाठीची ही पहिलीच निवडणूक होती.

ABOUT THE AUTHOR

...view details