नवी दिल्ली -कोरोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेक कलाकारांनाही याची लागण झाली होती. सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना देखील कोरोनाची लागण झाली. त्यांना 5 ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांनी स्वतःच व्हिडिओ तयार करून यातून आपण ठीक असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. आज (शुक्रवार) चेन्नई येथील खासगी रुग्णालयात दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
5 ऑगस्टला पोस्ट केलेल्या या व्हिडीओत त्यांनी 'गेल्या दोन-तीन दिवसांपासून माझी तब्येत बरी नाही. सर्दी आणि ताप होता. त्यामुळे मी कोरोना चाचणी करून घेतली. तेव्हा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांनी मला घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्याचा सल्ला दिला', असे सांगितले होते. दोन आठवड्यांनंतर आठवड्यांनंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले. तेव्हापासून ते व्हेंटिलेटर आणि ईसीएमओ प्रणालीच्या सपोर्टवर आहेत. दरम्यान 7 सप्टेंबरला केलेल्या चाचणीनंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.
बालसुब्रमण्यम यांचा संक्षिप्त परिचय
- एसपीबी यांचा जन्म 4 जून 1946 ला आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कोनेटम्मापेटा येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रह्मण्यम असे होते. गायक एस.पी. शैलजा यांच्यासह त्यांना दोन भाऊ व पाच बहिणी आहेत.
- त्यांचे वडील आंध्र प्रदेशातील हरिकथा विद्वान (धार्मिक कथांचे आख्यान करणारे) होते. त्यांनी उपजीविकासाठी गावच्या चौकात धार्मिक लोकगीते गायिली. बालसुब्रमण्यम यांची कलाक्षेत्रातील ही पहिली ओळख होती.
- त्यांचे दक्षिण भारतीय पारंपरिक संगीतातील औपचारिक शिक्षण झाले नव्हते. मात्र, त्यांचे कान इतके चांगले होते की कोणत्याही शास्त्रीय प्रशिक्षण नसणे हा त्यांच्यासाठी अडथळा ठरला नव्हता. ते प्रांजळपणे कबूल करत असत की, 'आजही मला अभिजात संगीतातीत 'अ..आ..ई 'सुद्धा माहीत माहित नाही.'
त्यांचे शिक्षण आणि संगीताची आवड
- एसपी बालसुब्रमण्यम अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी अनंतपुर येथील जेएनटीयूमध्ये दाखल झाले. पण काही कारणास्तव त्यांनी महाविद्यालय सोडले. त्याच वेळी, त्यांनी चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्समध्ये प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी अनेक संगीत स्पर्धांमध्ये भाग घेतला.
- एक दिवस 1963 मध्ये जेव्हा ते मद्रास अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होते, तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांचे सुगम संगीत स्पर्धेसाठी त्यांचे नाव नोंदवले. बालसुब्रमण्यम यांनी गाणे लिहिले, गुणांची आणि सुरांची रचना केली आणि ते गायले. गाणे संपण्यापूर्वीच त्यांना सर्वोत्कृष्ट ठरविण्यात आले.
- या ठिकाणी त्यांनी आपल्या आवाजाने उपस्थितांना चकित करून सोडले आणि एक स्पर्धा जिंकली. या स्पर्धेचे परीक्षण एस.पी. कोदंडपाणी यांनी केले होते. यानंतर एस. पी. कोदंडपाणी एस. पी. बालसुब्रमण्यम यांचे गुरू बनले.
- बालसुब्रमण्यम यांनी संगीत उस्ताद इल्लायराजा यांच्यासह संगीत मंडळाची स्थापना केली
- एसपीबी संगीत पथकात संगीत प्रमुख असायचे. त्यांचे मित्र अनिरुद्ध हार्मोनियमवर आणि नंतर उस्ताद इलयाराजा गिटार आणि इतर वाद्यांच्या साथीला तसेच, इलयाराजा यांचे बंधू भास्कर इतर वाद्यांची साथ करत असत. तर, गंगाईमारन हेही गिटार वाजवत असत.
चित्रपटांमध्ये त्यांची आवड
- पार्श्वगायक बालसुब्रह्मण्यम यांनी 1966 मध्ये त्यांचे गुरू एस. पी. कोदंडपाणी यांचा तेलुगु चित्रपट श्री श्री श्री मर्यादा रामण्णाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
त्यांना मिळालेला मोठा ब्रेक
- 1969 मध्ये त्यांच्याकडे तामिळ चित्रपटांमधील मोठी संधी चालून आली. एम.जी. रामचंद्रन यांनी प्रख्यात संगीत दिग्दर्शक के.व्ही. महादेवन यांना त्यांना 'अडीमाई पेन' (गुलाम मुलगी) मध्ये काम करण्यासाठी आमंत्रित करण्यास सांगितले. त्यांचे पहिलेच गाणे जबरदस्त 'हिट' झाले.
- यानंतर त्यांनी टीएम सौंदराजन यांचे अनभिषिक्त सम्राटाचे पद अक्षरशः काढून घेतले आणि तेलगू चित्रपटात पहिल्या क्रमांकावर असलेल्या घंटासाला यांनाही मागे टाकत पहिले स्थान पटकावले.
- त्यांनी 1969 मध्ये शांती निलयम या चित्रपटातील 'एयारकाई एन्नम इल्लाया कन्नी' हे त्यांचे पहिले तमिळ गीत गायिले. या चित्रपटाने अभिनेता जेमिनी गणेशन याला सुपरस्टार बनवले.
- त्यांनी एमजीआर यांच्यासाठी अडीमाई पेन या चित्रपटासाठी पुन्हा गायन केले.
- यानंतर त्यांनी लवकरच कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषांमधील चित्रपटामध्येही गायन केले.
उमेदीच्या काळात असे होते त्यांचे दिवसाचे कार्य-वेळापत्रक
- बालसुब्रमण्यम यांच्यासारख्या नवीनच पदार्पण करणाऱ्या तरुणासाठी अत्यंत व्यग्र शैलीचा दिनक्रम होता. अशी दिनचर्या म्हणजे एखाद्याला शिक्षाही वाटू शकेल.
- ते सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत रेकॉर्डिंग करत असत. सकाळी नऊ वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत शूटींग असे. यामध्ये शक्य तेव्हा एका तासाची विश्रांती ते घेत असत. यानंतर सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत पुन्हा रेकॉर्डिंग असे. याचा सोप्या शब्दांत अर्थ असा की, 'एका दिवसांत सुमारे 19 गाणी रेकॉर्ड करणे.'