महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कारगिल शौर्यगाथा : पाकिस्तानी सैनिकी कमांडर्सनी अशा प्रकारे रचले होते कारस्थान..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७१ नंतर अनेक लष्करी संघर्ष होत आले आहेत. दोन्ही देशांकडून आण्विक चाचण्या केल्यावर तणाव अधिकच वाढला होता. याच दरम्यान कारगिल युद्ध घडून गेले. याचा कट ४ पाकिस्तानी लष्करी कमांडर्सनी रचला होता. तरीही, भारतीय सैन्याने त्यांची संपूर्ण योजना हाणून पाडली. या, पाकिस्तानच्या या कटाबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

Pakistan Plan For Kargil Operations
कारगिल शौर्यगाथा : पाकिस्तानी सैनिकी कमांडर्सनी अशा प्रकारे रचले होते कारस्थान..

By

Published : Jul 24, 2020, 8:01 PM IST

हैदराबाद : कारगिल युद्ध, ज्यास ऑपरेशन विजय या नावानेही ओळखले जाते, भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे आणि जुलै १९९९ दरम्यान कश्मिरच्या कारगिल जिल्ह्यात झालेल्या सशस्त्र संघर्षाचे नाव आहे. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. तरीही भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या अभद्र हेतू हाणून पाडत त्यांना पिछाडीवर टाकले. अखेर पाकिस्तानने अशी आगळीक का केली, कुणी ही योजना तयार केली आणि कशी पाकिस्तानने भारताच्या सरहदीवर आक्रमण करण्याचे दुःसाहस का केले.

४ पाकिस्तानी जनरल्सनी मिळून बनवली होती संपूर्ण योजना..

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ, चीफ ऑफ जनरल स्टाफ लेफ्टनंट जनरल अझीझ खान, एक्स कॉर्पचे कमांडर लेफ्टनंट जनरल मेहमूद आणि कमांडर फोर्स कमांड उत्तर क्षेत्राचे मेजर जनरल जावेद हसन संपूर्ण गोपनीयतेने ही योजना तयार केली होती.

योजनेचा डावपेचात्मक उद्देष्य..

  • भारतीय सैन्याचे माजी अधिकारी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपले पुस्तक ए रिज टु फारमध्ये असे लिहिले आहे की १९८० च्या दशकात पाकिस्तानच्या मनात या युद्ध खेळाचा विचार आला होता.
  • कारगिल ऑपरेशनची योजना पाकिस्तानी सैन्याने १९८० च्या दशकात प्रथम अध्यक्ष जनरल झिया आणि नंतर १९९० च्या दशकात पाकिस्तानी पंतप्रधान बेनझिर भुट्टो यांच्यासमोर मांडली होती, परंतु त्यांनी ही योजना खूप धोकादायक असल्याचे समजून हे युद्ध लढण्यास नकार दिला.
  • अमरिंदर यांनी म्हटले आहे की भारताने १९८६ मध्ये ऑपरेशन ब्रास्टेक्स आयोजित केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याने भारतावर आक्रमण करण्याच्या विविध शक्यता पडताळून पहात ऑपरेशन ट्रुपॅक नावाची योजना तयार केली.
  • त्यानंतर जवळपास १० वर्षांनी मुशर्रफ १९९८ मध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख बनले. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन ट्रुपॅकचा स्विकार केला आणि ते सुरू करण्याचा निर्णय घेतला.
  • पाकिस्तानला असे वाटते होते की खोर्यात त्याचे अभद्र हेतू साध्य होत नाहियेत. म्हणून पाकिस्तानने पुन्हा त्यांचे रूपांतर ऑपरेशन ट्रुपॅकमध्ये केले आणि मुशर्रफ लष्करप्रमुख झाल्यावर ऑपरेशन बद्रच्या नावाने पुन्हा ही योजना अमलात आणली गेली.

तीन संभाव्य राजनैतिक हेतू..

  • भारतातील राजनैतिक चित्र १९९९ च्या सुरूवातीला अस्थिर मानले जात असे आणि भारताकडून मोठी प्रतिक्रिया उमटण्याची अशक्य आहे, असे मानले गेले.
  • पाकिस्तान अशी परिस्थिती निर्माण करू पहात होता की ज्यामुळे एलओसीवर ताबा मिळवल्यानंतर भारताशी चर्चा करण्यास तो सक्षम झाला असता.
  • एक सैनिकी मोहिम सुरू करून कश्मिरच्या मुद्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याची संधी तयार करण्यात आली होती.

आण्विक पार्श्वभूमी..

त्याच दरम्यान, दोन्ही देशांनी अणुचाचण्या घेतल्या होत्या. पाकिस्तानने असा विचार केला की यामुळे कमीत कमी जोखमीसह आंतरराष्ट्रीय समुदाय हस्तक्षेप करेल, तोपर्यंत पाकिस्तानचे उद्देष्य साध्य झालेले असतील.

युद्धाचे लष्करी उद्देष्य..

पाकिस्तानने अशाच क्षेत्रांमध्ये आपली कारवाई सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले होते, जेथे कमीत कमी विरोध आणि कमीत कमी प्रतिक्रियांचा मुकाबला करावा लागेल.

राजनैतिक आणि क्षेत्रीय लाभ मिळवण्यासाठी एलओसीची स्थिती बदलणे आणि त्याचवेळेस खोर्यात दहशतवादाचे पुनरूज्जीवन करणे तसेच लडाखला श्रीनगरपासून अलग करणे.

पाकिस्तानी सैन्या लेहमध्ये स्थित भारतीय सैनिकांची एनएच-१ची कोंडी करेल. घाबरलेला भारत मग आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाईल आणि यामुळे कश्मिरवर चर्चा होऊ शकते किंवा कमीत कमी भारताला सियाचिनचा भाग रिकामा करावा लागला असता. ज्यावर भारताने १९८४ मध्ये ताबा मिळवला होता.

पाकिस्तानने भारताला पराभूत करण्याची योजना बनवली असली तरीही भारताच्या वीर जवानांनी त्याच्या सर्वच योजनांवर पाणी फेरले.

ABOUT THE AUTHOR

...view details