महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना दहशत : राजस्थानमध्ये कोरोनाचा बळी, 60 वर्षीय रुग्णाचा मृत्यू - COVID19 positive passed away in Rajasthan's Bikaner

आज सकाळी राजस्थानमधील बिकानेर येथे एका 60 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला.

कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू
कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू

By

Published : Apr 4, 2020, 9:47 AM IST

बिकानेर - जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचे बळी गेले असून मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढतच चालला आहे. आज सकाळी राजस्थानमधील बिकानेर येथे एका 60 वर्षीय कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मृत्यू झाला. देशामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कठोर उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे.

राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांमध्ये 12 नविन कोरोनाबाधित आढळले असून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 191 वर पोहचली आहे. यामध्ये दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेले तबलिगी जमातीचे 41 जण आहेत. राज्य आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

देशात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 547 वर पोहोचला आहे. यातील 2 हजार 322 रुग्ण सक्रिय आहेत. एकूण रुग्णांमधील 163 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 62 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतील तबलिगी जमात कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या नागरिकांमुळे भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वरती गेला आहे. या कार्यक्रमाला गेलेल्या 600 पेक्षा जास्त नागरिकांना कोरोना झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details