नवी दिल्ली- जम्मू काश्मीर प्रशासनाने रविवारी नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) नेत्यांच्या शिष्टमंडळाला पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला तसेच उपाध्यक्ष ओमार अब्दुल्ला यांना भेटण्याची परवानगी दिली. त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी १५ नेत्यांचे शिष्टमंडळ अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी श्रीनगरला पोहोचले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात झालेल्या घडामोडी पाहता ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
फारुख अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी १५ नेत्यांचे शिष्टमंडळ श्रीनगरमध्ये दाखल - जम्मू आणि काश्मीर
जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे पक्षाध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमार अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी पक्षातील १५ नेत्यांचे शिष्टमंडळ आज श्रीनगरमध्ये पोहोचले आहे. जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना दिलेल्या निवेदनानंतर राज्य सरकारने शिष्टमंडळाला भेटण्याची परवानगी मिळाली होती.
Farooq Abdullah