विशाखापट्टणम- मित्राने बॅटने मारल्याने एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम मधील कसारा भागातील हा प्रकार असून मृत विजय आणि त्याचा मित्र क्रिकेट खेळत होते. यावेळी त्यांच्यात झालेल्या भांडणातून ही घटना घडली.
क्रिकेट खेळताना मित्राने बॅटने मारल्याने 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू - boy heat by friend
मित्राने बॅटने मारल्याने एका 13 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथील ही घटना आहे.
विजय आणि त्याचे काही मित्र क्रिकेट खेळत होते. यावेळी विजय दोनदा विजयी झाल्याने त्याचा एक मित्र रागावला होता. यावेळी त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीत मित्राने विजयच्या पोटात बॅट मारली. विजयला अंतर्गत मार लागल्याने तो बेशुद्ध पडला. कुटुंबीयांना घडला प्रकार कळतात त्यांनी विजयला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार घेत असताना विजयचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विजयच्या घरच्यांनी याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. विशाखा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.