इंफाळ - मणिपूरमध्ये बुधवारी लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी तब्बल ९७६ जणांना ताब्यात घेण्यात आले. यासोबतच ८६६ वाहनेही जप्त करण्यात आली. यांमध्ये लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांपासून, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या लोकांचा समावेश होता.
अतिरिक्त पोलीस महासंचालक एल. कैलुन यांनी दिलेल्या माहितीनुसार; या सर्व लोकांना न्यायालयामध्ये सादर करुन, त्यांच्याकडून सुमारे सव्वा लाख रुपयांचा दंड वसून करण्यात आला. यांमध्ये तौबल जिल्हा आघाडीवर होता. जिल्ह्यात एकूण २६३ लोकांना अटक करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले.