इंदौर - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधिताचे रुग्ण वाढत चालेले आहेत. अशातच एक दिलासादायक बातमी इंदौरमधून समोर आली आहे. एका 95 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली असून महिलेला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.
दिलासादायक..! 95 वर्षीय महिलेची कोरोनावर मात, कुटूंबीयांकडून टाळ्या वाजवून स्वागत
एका 95 वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली असून महिलेला रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.
चंदाबाई परमार शहरातील नेहरू नगरमध्ये राहतात. 6 मेला चंदाबाईच्या कुटुंबातील सदस्यांची कोरोना तपासणी केली गेली, त्यामध्ये कुटुंबातील 6 लोक सकारात्मक आढळले. चंदाबाईंना संसर्ग झाल्याचे आढळल्यानंतर त्यांना 10 मे ला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर यशस्वी उपचार झाले असून त्यांनी कोरोनावर मात करून चंदाबाई घरी परतल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.
शहरातील कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, दरम्यान अनेक रुग्ण बरेही होत आहेत. गुरुवारी, कोरोनाशी लढा देऊन 16 रुग्ण घरी परतले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातील 1 हजार 174 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.