नवी दिल्ली - गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९०५ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९,३५२ वर पोहोचली आहे.
यांमध्ये ८,०४८ रुग्ण हे अॅक्टिव आहेत. तर, आतापर्यंत ९८० रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच, गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या एकूण बळींची संख्या ३२४ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली.
देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात (१,९८५) आढळून आले असून, त्यापाठोपाठ दिल्ली (१,१५४) आणि तामिळनाडूचा (१,०७५) क्रमांक लागतो. तसेच, सर्वाधिक बळींची नोंदही महाराष्ट्रात (१४९) झाली असून, त्यापाठोपाठ मध्यप्रदेश (४३), गुजरात (२६) आणि दिल्लीचा (२४) क्रमांक लागतो.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा उद्या शेवटचा दिवस आहे. सकाळी दहा वाजता पंतप्रधान देशाला संबोधित करणार आहेत. यामध्ये ते लॉकडाऊनबाबत पुढील माहिती देतील. त्यापूर्वी महाराष्ट्र, ओडिशा आणि तामिळनाडूनेही आपापल्या राज्यांमधील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवले आहे.
हेही वाचा :COVID-19 : ७० वर्षांच्या आजीची कोरोनावर मात; मंगळुरूतील रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज..