महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शाहीनबाग आंदोलनाचे ९० दिवस, हिंसाचारात नुकसान झालेल्यांना मदतीची मागणी - शाहीनबाग आंदोलनाला ९० दिवस

सीएए आणि एनआरसी विरोधात गेल्या ९० दिवसांपासून शाहीनबाग येथे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी रात्री आंदोलनकर्त्या महिलांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीमध्ये हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.

90 days for the Shaheenbagh agitation in delhi
शाहीनबाग आंदोलनाला ९० दिवस

By

Published : Mar 14, 2020, 8:17 AM IST

नवी दिल्ली - सीएए आणि एनआरसी विरोधात गेल्या ९० दिवसांपासून शाहीनबाग येथे आंदोलन सुरु आहे. शुक्रवारी रात्री आंदोलनकर्त्या महिलांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्लीमध्ये हिंसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या हिंसेमध्ये ज्यांचे नुकसान झाले त्यांना सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शाह यांना यावेळी महिलांनी केली.

आंदोलन सुरुच राहणार

सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरु असणारे आंदोलन चालूच राहणार आहे. कोरोनोपासून आम्हाला कोणत्याही प्रकारची भिती नाही. यापासून कसे सावध राहायचे हे आम्हाला माहित असल्याचे महिलांनी सांगितले. तसेच दिल्लीत झालेल्या हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले त्यांनी १ कोटीची शासनाने मदत करावी अशी मागणीही महिलांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details